
दोडामार्ग : 'पोस्टर ऐवजी, आरोग्य सेवा' व बुके ऐवजी बंधारे हा संदेश घेऊन दोडामार्ग येथे मोफत महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या हस्ते व युवा मोर्चा गोवा प्रदेश अध्यक्ष तुषार केळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. भाजप युवा नेते विशाल परब यांच्या संकल्पनेतून भाजप सिंधुदुर्ग व सिद्धिविनायक संस्था कोलझर यांच्या माध्यमातून याचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास शेकडोंच्या संख्येने रुग्णांनी सहभागी होत आरोग्याचा लाभ घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियान–२०२६’ अंतर्गत, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवा नेते विशाल प्रभाकर परब यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात 'मोफत महाआरोग्य शिबिरा'चे आयोजन करण्यात आलेय.
दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय येथे याचे आयोजन करण्यात आले होते. भाजचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर व युवा मोर्चा गोवा प्रदेश अध्यक्ष तुषार केळकर यांच्या हस्ते श्रीफळ फोडून या शिबिरास प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी नगराध्यक्ष चेतन चव्हाण, पं. स सभापती पार्वती गवस, जिप सदस्य व तालुका प्रमुख दीपक गवस, जि.प सदस्य श्वेता धरणे, युवा मोर्चा तालुका प्रमुख पराषर सावंत, ओमकार रेडकर, माजी तालुका प्रमुख रंगनाथ गवस, आनंद तळणकर, महिला शहर अध्यक्ष सविता नाईक, नगरसेवक संध्या प्रासादि, दीपिका मयेकर, आकाक्षा शेटकर, सोनल म्हावळणकर, सुनील गवस, गौरी पार्सेकर, संजय सातार्डेकर, भैया पांगम, दिक्षा महालकर डॉ रामदास रेडकर, सुधीर दळवी आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
या शिबिरासाठी रुबी हॉस्पिटल, भारती हॉस्पिटल, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, अथायु हॉस्पिटल, ज्युपिटर हॉस्पिटल, आदित्य बिर्ला हॉस्पिटल, लोकमान्य हॉस्पिटल, पुना हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल आणि डॉ.डी.वाय. पाटील हाॅस्पिटल यांचे सहकार्य लाभले. ग्रामीण भागातील नागरिकांना तज्ज्ञ वैद्यकीय सेवा आणि मोफत आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. समाजसेवेतून वाढदिवस साजरा करण्याचा विशाल परब यांचा संकल्प या महाआरोग्य शिबिरांच्या माध्यमातून साकार होत असून यानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रंगनाथ गवस यांनी केले. सूत्रसंचालन निलेश गुरव यांनी तर आभार शिरीह नाईक यांनी मानले.
सगळेच वाढदिवस साजरे करतात पण विशालने आरोग्यसेवेत वाढदिवस साजरा केला हा स्तुत्य उपक्रम : अतुल काळसेकर.....
सेवा पंधरवडा अभियानाच्या निमित्ताने दोडामार्गच्या जेव्हा मी मंडपात प्रवेश केला तेव्हा मला खुप आनंद झाला आणि रुग्ण सेवा बघून समाधान वाटलं.या उपक्रमाला माझ्या खूप खूप शुभेच्छा. विशालने या जिल्ह्यात 17/18 आरोग्य शिबीर घेतली. अनेकांना मदत करून आरोग्य सेवा दिली.वाढदिवस सगळेच साजरे करतात .मात्र विशालने वाढदिवस केला तो आरोग्य सेवेचे शिबीर राबवून, कधीच दिखावूपणा कुठेच नाही प्रत्येकाला त्याच्या निदानाचे निदान केल्याशिवाय माघारी परतावे लागले नाही.
नावाप्रमाणेच मनही विशाल : युवा मोर्चा गोवा प्रदेश अध्यक्ष तुषार केळकर
उभरता युवा नेता म्हणून दिल्ली पर्यंत त्यांचं नाव आहे. यां वाढदिवसा निमित्त आरोग्य सेवेचा पुढाकार घेऊन आरोग्य शिबीर आयोजित केल. मात्र आताची बेकारी पाहता पुढच्या वर्षी च्या वाढदिवसा निमित्त रोजगार मेळावा आयोजित करून तरुण तरुणीना रोजगार मिळवून देतील हे निश्चित आहे.
जनसेवा हीच ईश्वर सेवा : नगराध्यक्ष चेतन चव्हाण
जनसेवा हीच ईश्वर सेवा ही संकल्पना घेऊन हे कार्य युवा नेते विशाल परब यांनी हाती घेतले हे खरोखरचं मोठं काम केले आहे. त्यांनी दोडामार्ग तालुक्यातील जनतेसाठी शिबीर झाल्यामुळे याचा मोठा फायदा इथल्या जनतेला झाला असल्याचे म्हटले.












