LIVE UPDATES

कणकवलीत NCMC कार्ड नोंदणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

नगरसेविका सौ.मेघा सावंत यांचे आयोजन ; १२७ हून अधिक नागरिकांनी घेतला लाभ
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 10, 2026 18:16 PM
views 88  views
#kokansadlive#news update#konkan update#

कणकवली : कणकवली नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ९ मधील नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या NCMC कार्ड नोंदणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात १२७ हून अधिक नागरिकांनी नोंदणी करून लाभ घेतला. विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

शिबिराचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिक  भिकाजी जामदार यांच्या हस्ते करण्यात आला. नागरिकांना NCMC कार्डच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतूक तसेच डिजिटल सुविधांचा लाभ घेता यावा आणि कार्ड नोंदणीची प्रक्रिया स्थानिक पातळीवर सुलभ व्हावी, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमासाठी नगरसेविका  मेघा महेश सावंत यांनी पुढाकार घेतला. नागरिकांना नोंदणी प्रक्रियेबाबत आवश्यक माहिती व मार्गदर्शन मिळावे, तसेच प्रत्यक्ष नोंदणी करताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी शिबिराच्या माध्यमातून सहकार्य करण्यात आले.

शिबिराला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त करताना मेघा महेश सावंत म्हणाल्या, “नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात उपयोगी ठरणाऱ्या सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागील उद्देश आहे. नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन अशा प्रकारचे उपक्रम भविष्यातही सातत्याने राबविण्याचा प्रयत्न राहील.

यावेळी सुचित्रा पालव, नैना साळुंखे, चंद्रकांत ठुकरूल, सुभाष पालव, राजेश सावंत, रेखा सातवसे, मंगल मेस्त्री, बागवे, धीरज साटम, औदुंबर राणे, शरद बागवे, प्रसन्न सावंत, श्रीमती साटम, सौ. साळवी, लक्ष्मीकांत जामदार, सर्वेश बागवे, महेश सावंत, राजू सावंत, सेजल बागवे, नेहा सावंत, शांती आळवे, स्वाती काणेकर, रसिका राणे, श्रीमती वालावलकर, अमेया साटम, योगिता सावंत, कीर्ती सावंत, निखिल साटम, रविकांत सातवसे, ईश्वरा बिल्ले यांच्यासह परिसरातील बहुसंख्य महिला, ज्येष्ठ नागरिक व नागरिक उपस्थित होते.नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि १२७ हून अधिक लाभार्थ्यांनी घेतलेला लाभ यामुळे NCMC कार्ड नोंदणी शिबिर यशस्वी ठरले.