LIVE UPDATES

विभागीय जलतरण स्पर्धेत सिंधुदुर्गनगरीतील जलतरणपटूंचे यश

लिनांशा नाईक, शिवांश खोत यांनी पटकावली चॅम्पियनशिप
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: June 30, 2025 23:22 PM
views 45  views

सिंधुदुर्गनगरी : कोल्हापूर येथे झालेल्या विभागीय जलतरण स्पर्धेत सिंधुदुर्गनगरी येथील जलतरण तलावामध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या जलतरणपटूंनी उत्कृष्ट कामगिरी करत अनेक बक्षीसांची कमाई केली. विशेष करून शिवांश खोत व लिनांशा नाईक या छोटे जलतरणपटूंनी दमदार कामगिरी करत आपापल्या वयोगटात चॅम्पियनशीप पटकावली आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

कोल्हापूर येथील राष्ट्रीय जलतरणपटू स्वर्गीय सागर पाटील जलतरण तलाब येथे द्रोणाचार्य स्पोर्ट असोसिएशन पुणे यांच्या मार्फत विभागीय जलतरण स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेत सिंधुदुर्गनगरी येथील जलतरण तलावाचे जलतरण प्रशिक्षक प्रविण सुलोकार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध गटांमधून स्पर्धेत सहभाग घेतलेल्या सिंधुदुर्गनगरी येथील जलतरणपटूंनी यश मिळवले आहे, या यशस्वी जलतरण पटूंचे कोल्हापूर जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांच्यामार्फत बक्षिस देऊन गौरव करण्यात आला.

विभागीय स्पर्धेत यश मिळवलेल्या जलतरणपटूंमध्ये शिवांश शिवप्रसाद खोत या जलतरणपटूने ७ वर्षा खालील वयोगटामध्ये १०० मी. फ्री स्टाईल प्रथम, ५० मी. बटर फ्लाय प्रथम, ५० मी. फ्री स्टाईल प्रथम आणि ५० मी. बैंक स्ट्रोक प्रथम या चारही प्रकारात प्रथम क्रमांक मिळवून चॅम्पियनशिप पटकावली आहे. तसेच मुलींच्या ७ वर्षा खालील गटामध्ये लिनांशा हितेश नाईक हिने १०० मी. फ्री स्टाईल प्रथम, ५० बटर फ्लाय प्रथम, ५० फ्री स्टाईल प्रथम आणि ५० मी. बैंक स्ट्रोक द्वितीय क्रमांक मिळाल्याने तिनेही चॅम्पियनशिप पटकावली आहे.

तसेच युवान दिपक आचरेकर याने ९ वर्षा खालील मुलांच्या गटात ५० मी बटर फ्लाय दुसरा क्रमांक, ५० फ्री स्टाइल दुसरा क्रमांक पटकावला आहे. सिद्धी प्रदीप चव्हाण हिने ९ वर्षा खालील मुलींच्या गटात ५० मी. फ्री स्टाईल मध्ये दुसरा क्रमांक, १०० मी. फ्री स्टाईल दुसरा क्रमांक, ५० ब्रेस स्टाईल मध्ये प्रथम व मांक मिळवला आहे. तर स्वरा उल्हास पालव हिने १३ वर्षा खालील मुलींच्या गटात १०० मी. बटर फ्लाय मध्ये द्वीतीय क्रमांक पटकावला आहे. तसेच या स्पर्धेत सिंधुदुर्गनगरी येथील वेदांत फोफळे, उत्कर्ष निवतकर, स्वरा गावडे, स्वराज सावंत, अर्थव सावंत यांनीड्डी सहभाग घेत चमकदार कामगिरी केली आहे. सिंधुदुर्गनगरी येथील जलतरणपटूंच्या या यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसुळ, सहाय्यक जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे, राऊल गायकवाड, सचिन रणदिवे यांनी सर्व जलतरणपटूंचे विशेष अभिनंदन केले आहे.