रिंकू सिंह बनला शिक्षणाधिकारी

Edited by: ब्युरो न्यूज
Published on: June 27, 2025 19:26 PM
views 90  views

क्रिकेट विश्वात आपल्या स्फोटक फलंदाजीने लाखो लोकांची मने जिंकणारा रिंकू सिंह आता एक नवीन इनिंग सुरू करणार आहे. परंतु, यावेळी मैदान क्रिकेटचे नाही तर सरकारी शिक्षण विभागाचे आहे. उत्तर प्रदेशातील अलीगडपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपर्यंतचा प्रवास करणाऱ्या रिंकू सिंहला आता राज्य सरकारने मोठा सन्मान दिला आहे.

रिंकू सिंहची "आंतरराष्ट्रीय पदक विजेता थेट भरती नियम-2022" अंतर्गत जिल्हा मूलभूत शिक्षण अधिकारी (BSA) पदावर नियुक्ती केली जात आहे. राज्य सरकारच्या या धोरणानुसार, देशाला गौरव मिळवून देणाऱ्या खेळाडूंना सरकारी सेवेत योग्य स्थान दिले जात आहे.

रिंकू सिंगच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या संदर्भात, उत्तर प्रदेश मूलभूत शिक्षण विभागाने एक अधिकृत पत्र देखील जारी केले आहे. BSA पदावर नियुक्ती होणाऱ्या रिंकू सिंहकडे महाविद्यालयीन पदवी देखील नाही. तरी देखील त्याला बीएसए पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.