कर्ली नदीपात्रात पुलावरून अनोळखी व्यक्तीची उडी

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: June 30, 2025 20:15 PM
views 376  views

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील नेरुरपार येथील कर्ली नदीच्या पात्रात थेट पुलावरून एका अनोळखी व्यक्तीने उडी घेतली. ही धक्कादायक घटना आज दुपारी साधारण १ ते १:३० वाजण्याच्या सुमारास घडली. तेथून जात असलेल्या एका रिक्षा चालकाने एका व्यक्तीने पुलावरून थेट नदीपात्रात उडी घेतलेली पाहिले. घटनेची माहिती मिळताच काही जागरूक नागरिकांनी तात्काळ कुडाळ पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. मात्र, ती व्यक्ती कोण होती, कशासाठी नदीपात्रात उडी घेतली हे प्रश्न अनुत्तरीतच आहेत. कुडाळ पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, या व्यक्तीबद्दल काही माहिती असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. जेणेकरून त्या व्यक्तीची ओळख पटवून पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यास मदत होईल असं आवाहन करण्यात आलंय.