वैभव नाईकांसह कार्यकर्त्यांची दोन खटल्यांमधून निर्दोष मुक्तता

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: June 30, 2025 23:22 PM
views 1123  views

सिंधुदुर्ग : शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त २०१९ मध्ये पेट्रोल दरवाढीविरोधात कुडाळ येथे माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आले होते. त्यावेळी माजी आमदार वैभव नाईक आणि त्यांच्या १० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, सबळ पुराव्याअभावी वैभव नाईक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची या प्रकरणातून कुडाळ न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

तसेच अन्य प्रकरणी डिसेंबर २०२१ मध्ये झालेल्या कुडाळ नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला विजय प्राप्त झाला होता. त्यावेळी माजी आमदार वैभव नाईक आणि त्यांच्या अन्य ७ कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात विजयी जल्लोत्सव साजरा केला होता. त्यावेळी त्यांच्यावर आणि कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी सुद्धा कुडाळ न्यायालयाने माजी आमदार वैभव नाईक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणी ऍडव्होकेट सुधीर राऊळ आणि एडवोकेट कीर्ती कदम यांनी माजी आमदार वैभव नाईक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या बाजूने युक्तिवाद केला होता.