मिनी प्रो कबड्डी सिरीजसाठी अमित गंगावणेंची पंच म्हणून निवड

अनेक स्पर्धांमध्ये पंच म्हणून बजावली यशस्वीरीत्या कामगिरी
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: June 28, 2025 20:16 PM
views 494  views

मुंबई : मुंबई येथे होणाऱ्या युवा ( मिनी प्रो. कबड्डी) सिरीजसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुप्रसिद्ध पंच श्री.अमित गंगावणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री गंगावणे यांनी यापूर्वी अनेक कबड्डी स्पर्धांमध्ये पंच म्हणून यशस्वीरीत्या कामगिरी पाहिली आहे. त्यांची या सिरीज साठी निवड झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

श्री गंगावणे हे सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात उपचिटणीस शाखेमध्ये महसूल सहाय्यक या पदावर कार्यरत आहेत.