LIVE UPDATES

कुंदेत वृक्षारोपणाने 'कृषी दिन' साजरा

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 02, 2026 13:22 PM
views 19  views

सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र कृषी दिनाचे औचित्य साधून दि. १ जुलै २०२६ रोजी कुंदे (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) ग्रामपंचायत येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रवेळी कुंदे गावाचे सरपंच रुपेश तायशेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत गावामध्ये विविध उपयुक्त वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमाला ग्रामपंचायतीचे सर्व सन्माननीय सदस्य, गावातील शेतकरी बांधव आणि कृषी क्षेत्राचे भविष्य असणारे कृषिदूत कु. सिद्धार्थ भोसले, कु. मानस पाटील, कु. पृथ्वीराज मदने, कु. राहुल राठोड व कु. तेजस माळी प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात हरित क्रांतीचे जनक कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी सरपंच श्री. रुपेश तायशेटे यांनी, "केवळ झाडे लावणे पुरेसे नसून त्यांचे जतन करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे," असे आवाहन केले. तसेच उपस्थित कृषिदूतांनी शेतकरी बांधवांशी संवाद साधत आधुनिक शेती आणि वृक्षलागवडीचे महत्त्व पटवून दिले. गावातील ग्रामस्थ आणि शेतकरी बांधवांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा कृषी दिन आणि वृक्षारोपण कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.