LIVE UPDATES

गोरक्षक सिंधुदुर्ग व ओनकॉल रक्तदाता संघटनेच्या विद्यमाने रक्तदान शिबिर

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 19, 2026 13:00 PM
views 30  views

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त गोरक्षक सिंधुदुर्ग आणि ऑनकॉल रक्तदाता संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 

सोमवार, 23 जून 2026 सकाळी 9:00 ते दुपारी 2:00 वाजेपर्यंत उपजिल्हा रुग्णालय रक्तपेढी सावंतवाडीत हा कार्यक्रम होणार असून नितेश राणे यांच्या सामाजिक कार्याला प्रेरणा मानून 'रक्तदान हेच जीवनदान' या भावनेतून या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेता जास्तीत जास्त नागरिकांनी, युवकांनी व कार्यकर्त्यांनी या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन गोरक्षक सिंधुदुर्ग व ओनकॉल रक्तदाता संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी केले आहे. रक्तदात्यांना प्रमाणपत्र व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व रक्तदात्यांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा उपक्रम यशस्वी करावा असे आवाहन केले आहे