
देवगड : शासन परिपत्रकानुसार प्रशालेमध्ये आज सकाळी गुरुवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी प्रशालेचे मुख्याध्यापक वाळके यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.यावेळी महात्मा गांधी विद्यामंदिर तळेबाजार हायस्कूलच्या वतीने रानभाज्या व गावठी बाजाराचे आयोजन करण्यात आले. या बाजाराचे उद्घाटन त.पं.शि.प्र.मंडळाचे अध्यक्ष संदीप तेली यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले.
या कार्यक्रमास संस्थेचे खजिनदार . संतोष वरेरकर, सदस्य नाना पारकर, ग्रामस्थ, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या रानभाज्या, गावठी खाद्यपदार्थ व स्थानिक उत्पादनांचे स्टॉल मांडले. एकूण २०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना स्थानिक पिके, रानभाज्या, पारंपरिक खाद्यसंस्कृती तसेच स्थानिक बाजारपेठेचे महत्त्व समजण्यास मदत झाली. कार्यक्रमास ग्रामस्थ व उपस्थित मान्यवरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.











