
कणकवली : कणकवली येथून फोंडाघाट येथे जात असताना नियंत्रण सुटल्याने ब्रिझा कारचा अपघात झाला. या अपघातात कारचालक मैत्रेय उर्फ गोट्या राजेश पेडणेकर (२८, फोंडाघाट - बाजारपेठ) याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात डामरे (करूळ) कानडेवाडी स्टॉप जवळ बुधवारी रात्री ९.४५ वा. सुमारास घडला.
मैत्रेय आपल्या ताब्यातील ब्रिझा गाडीने कणकवली वरून फोंडाघाट येथे जात होता. डामरे (करूळ ) कानडेवाडी स्टॉप येथे ताबा सुटून कार रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन रस्त्याच्या बाजूला असलेल्या मातीच्या ढिगार्यावरती आपटली. यात मैत्रेय याचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळतात पोलीस उपनिरीक्षक प्रितेश पाटील, हवालदार विनोद चव्हाण आदी घटनास्थळी दाखल झाले होते. घटनास्थळी नागरिकांची ही मोठी गर्दी झाली होती. अपघाताची कणकवली पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.










