LIVE UPDATES

हुमरमळा-करमळीवाडी शाळा इमारत निर्लेखित करण्याचे आदेश

नवीन इमारतीचे अंदाजपत्रक तयार करण्याचे निर्देश
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 07, 2026 20:21 PM
views 9  views

  • जिल्हा परिषद अध्यक्ष - उपाध्यक्षांनी घेतली तात्काळ दखल 

कुडाळ : तालुक्यातील हुमरमळा (वालावल) करमळीवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तातडीने निर्लेखित करुन प्रस्ताव पाठवा, अशा प्रकारचे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत आणि जिल्हा उपाध्यक्ष दादा साईल यांनी गटशिक्षणाधिकारी व सार्वजनिक जिप बांधकाम विभागाला दिले आहेत. याबाबत पंचायत समिती सदस्य अर्चना बंगे यांनी शिक्षण विभागाचे लक्ष वेधले होते. 

करमळीवाडी प्राथमिक शाळा इमारत मुले बसण्यास धोकादायक झाली असल्याने ती नविन बांधण्यात यावी अशी मागणी पंचायत समिती सदस्या अर्चना बंगे यांनी केली होती.  याची दखल घेत जि प अध्यक्ष प्रमोद कामत आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांनी तातडीने धाव घेत पालकांना व विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. संपूर्ण शाळेच्या इमारतीचे अंदाज पत्रक तातडीने तयार करुन पाठवण्याचे आदेश दिले आहेत

 यावेळी सरपंच अमृत देसाई, गटशिक्षणाधिकारी श्री राऊत, पंचायत समिती सदस्या अर्चना बंगे, ग्रामसेवकां अपर्णा पाटील, शैलेश मयेकर आदी उपस्थित होते.