LIVE UPDATES

बोडदे शाळेत निपुण माता मेळावा

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 21, 2026 17:50 PM
views 47  views
#kokansadlive#news update#konkan update#

दोडामार्ग : महाराष्ट्र शासनाच्या निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा बोडदे येथे इयत्ता पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांच्या मातांचा निपुण माता मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

 या मेळाव्यात मातांचा सक्रिय सहभाग घेऊन माता गटाची स्थापना करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मातांनी घरी मुलांचा अभ्यास घेणे, त्यांना वाचन-लेखन व गणिताच्या मूलभूत संकल्पनांचा सराव करून देणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मुलांच्या शिक्षणात पालकांचा सहभाग वाढवून समाजासमोर एक आदर्श निर्माण करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. 

यावेळी शैक्षणिक कार्यात उत्कृष्ट सहभाग घेणाऱ्या व मुलांच्या अभ्यासासाठी चांगले काम करणाऱ्या मातांचा सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात आला. मातांच्या या सहभागाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.

 कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंजुश्री परब, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. साक्षी नाईक, सौ. शितल गवस , इतर माता सदस्य, तसेच गावातील ग्रामपंचायत सदस्यांनी विशेष सहकार्य केले. या उपक्रमाचे केंद्रप्रमुख दत्ताराम दळवी, तालुका निरीक्षक रघुनाथ सोनवलकर व गटशिक्षणाधिकारी निसार नदाफ यांनी विशेष कौतुक केले. मातांचा शाळेच्या शैक्षणिक प्रक्रियेत वाढता सहभाग हा निपुण महाराष्ट्र अभियानाच्या यशासाठी महत्त्वाचा ठरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.