
सावंतवाडी : माजी खासदार विनायक राऊत यांच्या कौटुंबिक प्रकरणाला राजकीय रंग देऊ नका असे आवाहन कॉंग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी यांनी केले आहे. त्या म्हणाल्या, या प्रकरणाकडे केवळ एका मानवी दृष्टीकोनातून पाहिले जावे , कोणत्याही व्यक्तीच्या वैयक्तिक किंवा कौटुंबिक विषयाला राजकीय अथवा सामाजिक रंग देऊन त्यावर राजकारण करणे अत्यंत चुकीचे असल्याचे मत व्यक्त करत राजकारण न करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. अशा संवेदनशील प्रकरणात समाजाने आणि माध्यमांनी संयम , जबाबदारी ,आणि गोपनीयतेचा आदर राखावा असा सल्लाही त्यांनी दिला . गिरीजा राऊत यांनी केलेल्या आरोपांमध्ये जर तथ्य असेल , तर न्यायव्यवस्था योग्य तो न्याय करेल असा विश्वास सौ .साक्षी वंजारी यांनी व्यक्त केला आहे .










