
सावंतवाडी : तालुक्यातील इन्सुली गावचे सुपुत्र आणि दशावतारी कलाकार गौरव शिर्के यांनी ऑक्सफर्ड विश्वविद्यालय युनिव्हर्सिटी (युके) मधून दशावतार या विषयात डॉक्टरेट मिळविल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे . गौरव शिर्के यांनी वयाच्या पाचव्या वर्षापासुन दशावतार कलेत पदार्पण करत गेली २५ वर्षे दशावतार कलेत कार्य केले. या कलेसाठी जिल्ह्याबरोबरच राज्यस्तरीय असे एकूण ९२ पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. दशावतारात अनेक कथानकांचे लेखन देखील त्यांनी केले आहे . त्याशिवाय त्यांनी वर्ल्ड एक्सलेंट बुक आँफ रेकाँर्ड अंतर्गत भारत, अमेरिका ,इंग्लंड, जपान ,दुबई ,स्पेन या सहा देशांमधून भारताचे प्रतिनिधित्व करत जागतिक स्थरावर सन्मान मिळवला. गरूड, गर्वहरण यांसारख्या नाटकात गौरव शिर्के श्रीकृष्णाची भूमिका लीलया पार पडतात. वडील भाई शिर्के यांचा वारसा ते पुढे चालवत असून कै .शांती कलिंगण हे त्यांचे दशावतारातील प्रथम गुरु होत.










