LIVE UPDATES

कर्तृत्व आणि दातृत्वातून घडले विशाल नेतृत्व : मनोज उगवेकर

विशाल परब यांच्या मार्फत शिरोड्यात विद्यार्थ्यांना दप्तर व वह्या वाटप
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 15, 2026 17:16 PM
views 33  views

वेंगुर्ला : जिल्हा परिषद शाळा टिकल्या पाहिजेत असे सर्वच म्हणत असतात परंतु अशा शाळा टिकण्यासाठी जसा शैक्षणिक दर्जा महत्वाचा असतो त्याच प्रमाणे विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देणारे तसेच शैक्षणिक साहित्य व शाळेसाठी आवश्यक त्या गरजा पुरविणे तेवढेच आवश्यक असते.आणि याच उदात्त हेतूने भाजप युवा नेते विशाल परब सावंतवाडी विधानसभा मतदार संघात  विविध सामाजिक उपक्रम यशस्वी करून कार्य करीत आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत असलेला आनंद हीच त्यांच्या उद्देशाची पोच पावती असून कर्तृत्व आणि दातृत्व यातून घडलेले नेतृत्व म्हणजेच विशाल नेतृत्व असे गौरवोद्गार शिरोडा माजी सरपंच मनोज उगवेकर यांनी काढले. विशाल सेवा फाउंडेशन मार्फत भाजपचे युवा नेते विशाल प्रभाकर परब यांच्या माध्यमातून शिरोडा गावातील जिल्हा परिषद शाळामध्ये दप्तर व वहया या शैक्षर्णिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सेंट्रल प्रायमरी स्कूल शिरोडा नं १, प्राथमिक शाळा गावडेवाडी शिरोडा, पूर्ण प्राथमिक शाळा खर्डेवाडी शिरोडा, प्राथमिक शाळा वेळागरवाडी शिरोडा, पूर्ण प्राथमिक शाळा केरवाडा- शिरोडा या शाळामधील विद्यार्थ्यांना दप्तर व वहया या शैक्षर्णिक साहित्याचे वाटप करण्यात आले. 

  यावेळी भाजप वेंगुर्ला तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे, तालुका युवा मोर्चा सरचिटणीस तथा शिरोडा ग्रामपंचायत माजी उपसरपंच राहुल गावडे, शिरोडा बूथ अध्यक्ष अभय बर्डे, तालुका चिटणीस श्रीकृष्ण धानजी, पदाधिकारी  विदयाधर धानजी, दत्ताराम फटजी, नंदू धानजी,बअशोक परब, तुषार म्हाकले, सतीश तारी,  संतोष धानजी, आरवली भाजप शक्ती केंद्र प्रमुख महादेव नाईक, युवा मोर्चा सदस्य सोमाकांत सावंत, स्वप्निल तोरस्कर, प्रसाद परब,
विशाल सेवा फाऊडेशन चे शिरोडा संयोजक चंद्रशेखर गोडकर आदी मान्यवर उपस्थित होते.