
कणकवली : येथील न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाटचा बारावी परीक्षेचा निकाल अत्यंत उल्लेखनीय लागला असून यंदा तब्बल ९९.५४ टक्के निकाल नोंदवण्यात आला आहे. एकूण २१७ विद्यार्थी परीक्षेस बसले होते, त्यापैकी २१६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
शास्त्र विभागात ५९ विद्यार्थी परीक्षेस बसले होते आणि सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन १०० टक्के निकाल लागला आहे.
प्रथम – गायत्री विजयकुमार राठोड (७३.८३%)
द्वितीय – अथर्व नारायण राणे (६९.८३%)
तृतीय – नंदिनी कृपाल चौहान (६५.३३%)
कला विभागात ५७ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी ५६ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ९८.२५ टक्के लागला आहे.
प्रथम – जानवी रविंद्र पाटील (७७.५०%)
द्वितीय – भूमिका दिगंबर पानकर (७७.१७%)
तृतीय – गायत्री उमेश सुतार (७७%)
वाणिज्य विभागात ६९ विद्यार्थी परीक्षेस बसले होते आणि सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन १०० टक्के निकाल लागला आहे.
प्रथम – कोमल केशव गोसावी (८०.५०%)
द्वितीय – समाधान गजानन सावंत (७८.१७%)
तृतीय – कोमल रावजी गायकवाड (७५.३३%)
व्होकेशनल विभागात ३२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते आणि सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन १०० टक्के निकाल लागला आहे.
प्रथम – वैष्णवी दशरथ जोईल (७६.३३%)
द्वितीय – मोनिका विजय राठोड (७३.८३%)
तृतीय – समृद्धी संतोष रासम (७०.१७%)










