कसालच्या न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के

विज्ञान, वाणिज्य व कला शाखांत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
Edited by:
Published on: May 02, 2026 18:44 PM
views 533  views

कसाल: दी कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्था, कसाल संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कसाल या विद्यालयाने आपल्या यशाची परंपरा कायम राखत उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत १०० टक्के निकाल नोंदवला आहे. विशेष म्हणजे विज्ञान, वाणिज्य आणि कला या तिन्ही शाखांमधील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शाखानिहाय गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांची माहिती खालीलप्रमाणे:...


विज्ञान शाखा

विज्ञान शाखेत एकूण १०८ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते आणि सर्व १०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

प्रथम: कुमार पार्थ राघोजी परब (८२.१७%)

द्वितीय: कुमारी आर्या संतोष कांदळकर (७६.६७%)

तृतीय: कुमारी लेखा केशव सरवटे (७४.००%)


वाणिज्य शाखा 

वाणिज्य शाखेतून ५६ विद्यार्थी परीक्षेस बसले होते, त्यापैकी सर्व ५६ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.

प्रथम: कुमारी मानसी रवींद्र घाडीगावकर (८७.६७%)

द्वितीय: कुमारी मंजिरी मिलिंद तावडे (७९.८३%)

तृतीय: कुमार साक्षी संजय धुरी (७९.६७%)


कला शाखा

कला शाखेचाही निकाल १०० टक्के लागला असून २९ पैकी २९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

प्रथम: कुमार संस्कार आबा खांदारे (६४.००%)

द्वितीय: कुमार हरेश हेमंत हेदुळकर (६३.३३%)

तृतीय: कुमारी प्रगती शंकर वरक (६१.३३%)


विद्यालयाचा एकूण निकाल १०० टक्के लागला असून एकूण १९३ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, ते सर्व उत्तीर्ण झाले आहेत. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आनंद (भाई) सावंत, सचिव यशवंत परब, सर्व विश्वस्त, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.