LIVE UPDATES

लक्ष्मीनारायण मंदिराला पर्यटन तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची गरज

अँड. संग्राम देसाई यांचे प्रतिपादन ; वालावल येथे गुणवंतांचा सत्कार सोहळा
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 03, 2026 17:22 PM
views 33  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#

सिंधुदुर्ग : देशाच्या एकूण पर्यटनामध्ये धार्मिक पर्यटनाचा वाटा 60 टक्के किंवा त्याहून अधिक आहे. त्यामध्ये सातत्याने वाढ होत आहे. कोकण हा देशातील सर्वाधिक धार्मिक स्थळे असलेला भूप्रदेश आहे. त्यातही अनेक मंदिरे ही अति प्राचीन आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वालावल येथील लक्ष्मीनारायण मंदिर हे प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाते. मुळात हे एक तीर्थक्षेत्र आहे. आता आपल्या या तीर्थक्षेत्राला पर्यटन तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावयाचा आहे त्यासाठी सर्वांनी आपले योगदान देण्याची गरज आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र आणि गोवा बार कौ‌न्सिलचे अध्यक्ष आणि वालावल लक्ष्मीनारायण उपसमितीचे अध्यक्ष अँड.. संग्राम देसाई यांनी केले.

ग्रामपंचायत वालावल आणि श्री देव लक्ष्मीनारायण स्थानिक सल्लागार उप समिती यांच्या संयुक्त विद्यमाने वालावल पर्यटन विकास आणि रोजगार तसेच गुणवत्ता विद्यार्थ्यांचा सत्कार आणि शैक्षणिक साहित्य वाटप सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून अँड. संग्राम देसाई उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आणि सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाचे कार्याध्यक्ष सतीश पाटणकर, ज्येष्ठ वास्तू विषारद दिनकर सामंत तसेच माजी गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालवलकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गावचे सरपंच राजेश प्रभू यांनी केले. 

श्री. पाटणकर म्हणाले, सूर्यभान आणि चंद्रभान प्रभू देसाई बंधूनी चौदाव्या शतकाच्या सुरुवातीला हे पूर्वमुखी मंदिर बांधले गेल्याचे म्हटले जाते. हे मंदिर सुख समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक मानले जाते. मंदिराला लागून एक मोठा तलाव आहे. ते असंख्य पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. लक्ष्मीनारायणाचे मंदिर असलेल्या वालावल गावाला आदि पंढरी म्हणून ओळखले जाते. पंढरपूरच्या विठ्ठलाचा आषाढी एकादशीचा उत्सव या वालावल गावात सुरू होतो. वालावल मध्येच करली नदी आहे. हा परिसर म्हणजे पर्यटकांसाठी एक वेगळी पर्वणी असते. म्हणूनच हा गाव पर्यटन गाव भरून विकसित होण्याची गरज आहे. या गावाने अनंत शिवाजी टोपीवाले देसाई, रॉयल सर्कस चे वालावलकर, माजी मंत्री एस एन देसाई तसेच अनेक प्रशासकीय अधिकारी सामाजिक कार्यकर्ते देशाला दिले. त्यांची निवासस्थाने आणि गावातील त्यांचे स्थान हे पर्यटकांचे आकर्षण ठरू शकते. त्या दृष्टीने ही प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सतीश पाटणकर यांनी यावेळी व्यक्त केले. ज्येष्ठ वास्तू विषारद दिनकर सामंत यांनी इथल्या टुमदार घरात राहण्याची उत्तम सोय आणि उत्कृष्ट मालवणी भोजन उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त केली. यातून गावातील ग्रामस्थांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील असेही इत्यादी आपले मत व्यक्त केले. वालावल गाव देशाच्या पर्यटन नकाशावर येण्यासाठी आपले सर्व प्रकारचे सहकार्य लाभेल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. याप्रसंगी माजी गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांनीही आपले विचार मांडले. या कार्यक्रमास गावच्या उपसरपंच श्रीमती कवठणकर, पाल्यावर हायस्कूलचे मुख्याध्यापक कोठावळे, प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, माजी मुख्याध्यापक शिक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रात नाविदद्यपूर्ण कामगिरी बचावलेल्या विद्यार्थ्यांचा ग्रामस्थांचा सत्कार तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे आणि करण्यात आले.