
सावंतवाडी : विद्यार्थ्यांमधील वाचन संस्कृती, वक्तृत्व कौशल्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी कोंडुरे येथील पारिजात मंगल कार्यालय येथे कै. विद्याधर शिरसाट स्मृतिप्रीत्यर्थ शालेय विद्यार्थ्यांसाठी भव्य कथाकथन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेला तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ही स्पर्धा पहिली ते चौथी आणि पाचवी ते सातवी अशा दोन गटात घेण्यात आली . स्पर्धेची सुरुवात विद्यार्थ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कै.विद्याधर शिरसाट यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर आरोस विद्यालयाचे मुख्याध्यापक सदाशिव धुपकर,जनता विद्यालय तळवडेचे प्रसाद आडेलकर, सागर,कानजी, अमोल आरोसकर,दांडेली शाळेच्या शिक्षिका शर्मिला पारिपत्ये, साटेली तर्फ सातार्डा शाळेच्या अस्मिता आरोसकर,माजी केंद्रप्रमुख स्मिता नाईक,मळगाव रस्तावाडी शाळेचे दत्तगुरु कांबळी,रुपेश सावंत,अर्जुन मुळीक, मदन मुरकर आदी उपस्थित होते.स्पर्धेत विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक असे कथाकथन सादर केले.
या स्पर्धेतील विजेते स्पर्धक, (पहिला गट) प्रथम - सार्थक वालावलकर, द्वितीय - ओवी आडेलकर,तृतीय - कविराज मालवणकर तर उत्तेजनार्थ श्राव्या जाधव, सानवी शिरोडकर तसेच विशेष पारितोषिक रुची बर्डे .
(दुसरा गट ) प्रथम- वीरा वाईरकर ,द्वितीय - यश सावंत,तृतीय - वैदेही कामत तर उत्तेजनार्थ यशश्री आरोलकर, साजो मुळीक तसेच विशेष पारितोषिक गायत्री शेणई हिला देण्यात आले. गेली १४ वर्षे कै. विद्याधर शिरसाट स्मृतिप्रीत्यर्थ शालेय विद्यार्थ्यांसाठी कथाकथन स्पर्धेचे सातत्याने आयोजन करण्यात येत असून या स्पर्धेसाठी अनिरुद्ध शिरसाट यांच्या कडून स्पर्धेसाठी पारितोषिके व सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र पुरस्कृत केली. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून स्मिता नाईक,दत्तगुरु कांबळी यांनी काम केले. प्रस्तावना पुरुषोत्तम शेणई यांनी तर आभार अमोल आरोसकर यांनी मानले.










