LIVE UPDATES

कणकवलीत महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिर

महेश सावंत व नगरसेविका मेघा सावंत यांच्या माध्यमातून आयोजन : आयुष्मान व आभा कार्डचीही होणार नोंदणी
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 08, 2026 13:56 PM
views 55  views

कणकवली : महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासासह विविध प्रवासी सेवांचा लाभ सहज उपलब्ध व्हावा, यासाठी कणकवली शहरात एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्ते महेश सावंत व प्रभाग क्रमांक ९ च्या नगरसेविका मेघा महेश सावंत यांच्या माध्यमातून हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

हे शिबिर रविवार, ९ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत कणकवली येथील साहिल अपार्टमेंट, टेंबवाडी येथे होणार आहे. एसटी बसमधून प्रवास करताना तसेच प्रवासी सेवांमध्ये उपलब्ध असलेल्या सवलतींचा लाभ घेण्यासाठी NCMC कार्ड नोंदणी आवश्यक असल्याने नागरिकांना आपल्या प्रभागातच ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या शिबिरामध्ये एनसीएमसी कार्डसोबत आयुष्मान कार्ड व आभा कार्डची नोंदणी देखील करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना गर्दीत जाऊन रांगेत उभे राहण्याची आवश्यकता भासणार नसून, आपल्या वॉर्डमध्येच विविध कार्ड नोंदणीची सुविधा मिळणार आहे.

एनसीएमसी कार्ड नोंदणीसाठी २३० रुपये सेवा शुल्क आकारण्यात येणार आहे. नोंदणीसाठी आधार कार्डची झेरॉक्स प्रत आणि आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच पात्र नागरिकांनी या शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते महेश सावंत व नगरसेविका मेघा महेश सावंत यांनी केले आहे.