LIVE UPDATES

नरकासुर स्पर्धेला तुफान प्रतिसाद

दळवीवाडा माजगाव मंडळ प्रथम क्रमांकाचे मानकरी
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 08, 2026 02:41 PM
views 502  views

सावंतवाडी : भाजप युवा मोर्चा  व युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकारातून आयोजित नरकासुर स्पर्धेस तुफान प्रतिसाद मिळाला. हजारो नागरिकांच्या उपस्थितीत तलावाकाठी मध्यरात्री ही स्पर्धा संपन्न झाली. दोन गटात ही स्पर्धा झाली. मोठ्या गटात दळवीवाडा माजगाव या मंडळाच्या नरकासुरला प्रथम क्रमांकांचे बक्षीस प्राप्त झाले. 

या स्पर्धेला स्पर्धकांसह सावंतवाडीकरांचा तुफान प्रतिसाद मिळाला. लहान आणि मोठ्या गटात मिळून ४० हून अधिक नरकासुर सहभागी झाले होते. यात मोठ्या गटात दळवीवाडा प्रथम, चौघुलेश्वर हौशी मंडळ, केरवाडा- शिरोडा द्वितीय तर तृतीय क्रमांक बाळ गोपाळ मित्रमंडळ, पिंपळेश्वर माऊली यांनी प्राप्त केला. माठेवाडा आत्मेश्वर मंडळाला उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त झाला.रोख रक्कम, सन्मानचिन्ह असे बक्षिसाचे स्वरूप होते. 

तसेच लहान गटात देखिल मोठी चुरस निर्माण झाली होती. यात वटसावित्री कला क्रीडा मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय झिंगारो बॉईस, उभाबाजार द्वितीय तर बाळ गोपाळ मित्रमंडळ, उभाबाजार तृतीय क्रमांकांचे मानकरी ठरले. युनिक बॉईस सालईवाडा, झपाटा मित्रमंडळ सबनिसवाडा यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. यावेळी भाजप युवा नेते विशाल परब, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, भाजप नेते विनोद राऊळ, शहराध्यक्ष सुधीर आडीवरेकर, युवा मोर्चा अध्यक्ष हितेन नाईक, मोहिनी मडगावकर, दिपाली भालेकर, दिलीप भालेकर, ॲड. सिद्धार्थ भांबुरे, जितेंद्र गांवकर, सुकन्या टोपले, सुनिता पेडणेकर, विनेश तावडे आदींसह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेचे परिक्षण राजेश आजगावकर, उदय राऊत यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बादल चौधरी यांनी केले.