LIVE UPDATES

ठाणे–देवगड थेट एसटी बससेवेसाठी आमदार फाटक यांचा पाठपुरावा

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे तातडीचे निर्देश
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 29, 2026 19:23 PM
views 37  views

देवगड : ठाणे ते देवगड या मार्गावर नवीन एसटी बस सेवा सुरू करावी, अशी मागणी विधान परिषदेचे आमदार रवींद्र फाटक यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे. श्री. फाटक यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, ठाणे ते देवगड या मार्गावर मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, नोकरी-व्यवसाय करणारे, तसेच कोकणात ये-जा करणारे चाकरमानी प्रवास करत असतात. या मार्गावर थेट एसटी बससेवेची सुविधा नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. ठाणे ते देवगड थेट एसटी बस सेवा सुरू करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. जेणेकरून नागरिकांचा वेळ व पैसा वाचून त्यांना सुरक्षित व सोयीस्कर प्रवास करता येईल आणि कोकणातील नागरिकांना या सेवेचा मोठा लाभ होईल. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उद्दीष्ट हे राज्यातील जनतेला नियमित व कार्यक्षम सेवा उपलब्ध करून देणे आहे. नागरिकांच्या मागणीचा सकारात्मक विचार करून ठाणे ते देवगड अशी नवीन एसटी बस सेवा सुरू करण्याबाबत योग्य ते सहकार्य करावे, असे म्हटले आहे. श्री. सरनाईक यांनी या मागणीची दखल घेत एसटी प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांना सदर बसफेरी त्वरित सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.