LIVE UPDATES

धर्माची शिकवण देणाऱ्या मिशनरींना पोलिसांनी घेतले ताब्यात

बजरंग दल कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 15, 2026 15:07 PM
views 265  views

सावंतवाडी : येथील जगन्नाथराव भोसले उद्यानात मधल्या सुट्टीत विश्रांती घेत असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आपल्या धर्माची शिकवण देणाऱ्या मिशनरींना हिंदू संघटनांच्या आक्रमक पवित्र्यानंतर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. सावंतवाडी पोलीस ठाण्यात त्यांची चौकशी सुरू असून हे मिशनरी गोवा राज्यातील असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. आपल्याला हे मिशन देण्यात आले असल्याची कबुली त्यांनी दिली आहे. गेले आठ दिवस हे प्रकार सुरू आहेत. 

उद्यानात हा प्रकार सुरू असताना एका महाविद्यालयीन युवकांने बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना फोन केला. तसेच त्या प्रकाराचे छायाचित्रण करायला सुरुवात केली. त्याबरोबर त्या मिशनरींनी तिथून पलायन करण्याचा प्रयत्न केला. मात्र बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना थांबवले असता आपण विद्यार्थ्यांना धर्माची शिकवण देत होतो असे त्यांनी मान्य केले. या प्रकारानंतर पोलिसांना पाचारण करीत त्यांना ताब्यात देण्यात आले. पोलीस ठाण्यात त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तसेच हिंदू समाजातील नागरिकांनी अशा मिशनरीन पासून दूर राहावे. तसेच हे प्रकार सुरू असल्यास पोलिसांना तसेच हिंदू संघटनांना संपर्क साधावा असे आवाहन बजरंग दलातर्फे करण्यात आले आहे.