
वैभववाडी : ईद-ए-मिलादच्या निमित्ताने कोळपे येथे ग्रामपंचायत, सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान, वैभववाडी आणि ग्रामस्थ यांच्यावतीने ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ या मोहिमेंतर्गत महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात २२ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत रक्तदान केले.
ईद सण नुकताच साजरा झाला. याच औचित्य साधून रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीराला महीलांनी रक्तदान केले. यावेळी सरपंच सुनील काशिनाथ कांबळे, पोलीस पाटील अक्तरी इब्राहिम ठाणगे, संयोजक आजीम इकबाल काझी, समीर लांजेकर, मोसिम कासम पाटणकर, आशा सेविका सुश्मिता सुनील कांबळे, अंगणवाडी सेविका शकीला बापू चोघे, माध्यमिक शिक्षक नजरुद्दीन जमादार, सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेश मो. पडवळ उपस्थित होते.










