
कुडाळ : आपल्या शहराला स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त बनवण्याच्या उद्देशाने शनिवार, २९ ऑगस्ट रोजी सकाळी ठीक ७:३० वाजता 'एक दिवस माझ्या कुडाळासाठी' या विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. 'स्वच्छ कुडाळ, सुंदर कुडाळ, अभिमान आपला कुडाळ' असा संदेश देत राज हॉटेल जवळील अंडरपास येथून या मोहिमेची सुरुवात होणार आहे.
शहरातील विविध प्रमुख रस्ते, सार्वजनिक ठिकाणे आणि परिसर स्वच्छ करणे हा या मोहिमेचा मुख्य हेतू आहे. या संदर्भात बोलताना नगरसेवक मंदार शिरसाट यांनी सांगितले की, कुडाळ हे आपले घर आहे आणि ते स्वच्छ ठेवणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. प्रत्येक नागरिकाने आणि कार्यकर्त्याने या श्रमदानात आपला सहभाग नोंदवणे गरजेचे आहे.
शहरातील सर्व जागरूक नागरिक, तरुण आणि कार्यकर्त्यांनी या मोहिमेत शनिवार, २९ ऑगस्ट रोजी सकाळी ७:३० वाजता राज हॉटेल जवळील अंडरपास येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले योगदान द्यावे, असे आवाहन नगरसेवक मंदार शिरसाट आणि त्यांच्या सहकार्यांनी केले आहे.










