LIVE UPDATES

नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसलेंकडून दुकानाच्या नुकसानीची पाहणी

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 15, 2026 11:23 AM
views 66  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

सावंतवाडी : शहरात दुकानाला अचानक भीषण आग लागल्याची दुर्देवी घटना घडली होती. या आगीत दुकानाचे मोठे नुकसान झाले होते‌. या दुर्घटनेची माहिती समजताच सावंतवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे भोंसले यांनी घटनास्थळी जात पाहणी केली. 

यावेळी नगराध्यक्षांनी आगीच्या तीव्रतेची माहिती घेत झालेल्या नुकसानाचा सविस्तर आढावा घेतला आणि संबंधित यंत्रणेला योग्य त्या सूचना दिल्या. नुकसानग्रस्त संजीव निपाणीकर यांना मदत मिळवून देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी नियोजन सभापती आनंद नेवगी, आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर,  सभापती प्रतीक बांदेकर, तसेच नगरसेविका नीलम नाईक, सुकन्या टोपले, दुलारी रांगणेकर आदी उपस्थित होते.