LIVE UPDATES

पडेल नं 1 शाळेत ‘आयडियल सेंटर’चे उद्घाटन

विद्यार्थ्यांना आधुनिक डिजिटल शिक्षणाची नवी संधी उपलब्ध
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 05, 2026 05:22 PM
views 15  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#

देवगड : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पडेल नं1 येथे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी आणि डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून त्यांच्या ज्ञानकक्षा रुंदावाव्यात, या उद्देशाने उभारण्यात आलेल्या ‘आयडियल सेंटर’चा उद्घाटन सोहळा आज उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

या उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटन देवगड तालुक्याचे सभापती गणेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसभापती अमोल लोके , गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे , जिल्हा परिषद सदस्य श्रीमती सुयोगी घाडी ,पंचायत समिती सदस्य  अंकुश टुकरुल, पंचायत समिती सदस्या संजना आडवे , सरपंच  भूषण पोकळे, उपसरपंच  विश्वनाथ पडेलकर ,विस्तार अधिकारी  श्रीरंग काळे , केंद्रप्रमुख  विनायक पाटील 

शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा आरोही दीक्षित  यांच्यासह विविध मान्यवर, शिक्षक, ग्रामस्थ व माजी विद्यार्थी संघाचे सदस्य उपस्थित होते.यावेळी मान्यवरांनी संगणक केंद्राची पाहणी करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. बदलत्या शैक्षणिक प्रवाहात संगणक ज्ञान, डिजिटल साक्षरता आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर अत्यंत महत्त्वाचा असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा शाळेचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या संगणक केंद्रामुळे विद्यार्थ्यांना संगणकाचे मूलभूत ज्ञान, डिजिटल कौशल्ये, इंटरनेटचा शैक्षणिक वापर तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचे व्यावहारिक ज्ञान मिळण्यास मदत होणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील शिक्षकवृंद, माजी विद्यार्थी संघ, ग्रामस्थ, पालक आणि हितचिंतक यांनी विशेष परिश्रम घेतले.

‘ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या हातात संगणक आणि डोळ्यांसमोर उज्ज्वल भविष्य’ या संकल्पनेला मूर्त स्वरूप देणारे आयडियल  सेंटर पडेल नं 1 शाळेच्या शैक्षणिक प्रगतीतील एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे.


ताजी बातमी

View all

Sawantwadi Mayor Shraddharaje Bhosale celebrates Diwali with municipal employees and sanitation workers by distributing Diwali faral.
Sawantwadi Diwali Celebration : सफाई मित्रांसोबत नगराध्यक्षांनी साजरी केली दिवाळी
November 05, 2026
मुक्ताई ॲकेडमीच्या साक्षी रामदूरकरची विभाग स्तरावर विक्रमी पाचव्यांदा निवड
November 05, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#Sawantwadi News
Sawantwadi News :अनधिकृत मासेविक्री करताना आढळल्यास कारवाई
November 05, 2026
Industries Minister Uday Samant announces reduced MIDC fire charges and ₹10 crore funding for electrical infrastructure development at Kudal MIDC.
Sindhudurg MIDC Development : सिंधुदुर्गातील उद्योगांना चालना; एमआयडीसीच्या सेवा आता जिल्ह्यातच
November 05, 2026
संबंधित बातम्या

View all

Sawantwadi Mayor Shraddharaje Bhosale celebrates Diwali with municipal employees and sanitation workers by distributing Diwali faral.
Sawantwadi Diwali Celebration : सफाई मित्रांसोबत नगराध्यक्षांनी साजरी केली दिवाळी
November 05, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#Sawantwadi News
Sawantwadi News :अनधिकृत मासेविक्री करताना आढळल्यास कारवाई
November 05, 2026
Industries Minister Uday Samant announces reduced MIDC fire charges and ₹10 crore funding for electrical infrastructure development at Kudal MIDC.
Sindhudurg MIDC Development : सिंधुदुर्गातील उद्योगांना चालना; एमआयडीसीच्या सेवा आता जिल्ह्यातच
November 05, 2026
Maharashtra Minister Uday Samant announces a Malvani Research Centre in Sindhudurg to preserve and promote Malvani language and culture.
Malvani Research Centre in Sindhudurg : मालवणी भाषेचा स्वतंत्र शब्दकोश तयार करणार
November 05, 2026