
वैभववाडी : विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी खांबाळे येथील चौघा तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विक्रांत पवार(२३), परेश साईल(२५), तुषार कर्पे(२५) आणि अक्षय चव्हाण(२७) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.आज सायंकाळी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी संबंधित विवाहित महिलेला शितपेय दिले.ते प्यायल्यानंतर तिचं डोकं जड झालं.त्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आला व त्याचे व्हिडिओ बनविण्यात आले.हे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आले.
मार्चपासून सप्टेंबरपर्यंत हा प्रकार सुरू असल्याचे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.अखेर या सा-या प्रकाराला कंटाळून पीडित महिलेने मंगळवारी रात्री उशिरा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी विक्रांत पवार, परेश साईल,अक्षय चव्हाण या तिघांना मंगळवारी रात्री उशिरा तर तुषार कर्पे बुधवारी सकाळी अटक केली.या चौघांना आज (ता.७) सायंकाळी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. या प्रकरणाचा अधिक पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर करीत आहेत.










