LIVE UPDATES

विहिरीत पडलेल्या खवले मांजराला जीवदान

ग्रामस्थ अन् वनविभागाची तत्परता ; झाराप-मुंड्येवाडी येथील घटना
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 07, 2026 18:53 PM
views 52  views
#kokansadlive#news update#konkan update#

कुडाळ: वनविभाग सावंतवाडीच्या वतीने २ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत 'वन्यजीव सप्ताह' व 'सेवासंकल्प अभियान'  नियोजनबद्ध पद्धतीने राबवले जात आहे. या अभियानादरम्यान मौजे झाराप-मुंड्येवाडी येथे विहिरीत पडलेल्या एका खवले मांजराला ग्रामस्थ आणि वनविभागाच्या तत्परतेमुळे सुरक्षितपणे जीवदान मिळाले आहे.  

 झाराप-मुंड्येवाडी येथील  प्रविण रेडकर यांच्या घराशेजारी असलेल्या विहिरीत एक खवले मांजर पडल्याचे निदर्शनास आले. याबाबतची माहिती स्थानिक रहिवासी  अनिकेत तेंडुलकर यांनी नेरूर तर्फे हवेलीचे वनपाल यांना तत्काळ दिली. माहिती मिळताच वनअधिकारी घटनास्थळी पोहोचले.  

​वन कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच स्थानिक ग्रामस्थ प्रविण रेडकर व त्यांच्या सहकारी बांधवांनी प्रसंगावधान राखून काठीच्या सहाय्याने सदर खवले मांजराला विहिरीतून सुरक्षित बाहेर काढले व वन कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन केले.  

वनअधिकाऱ्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या या तत्परतेबद्दल व सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले. विहिरीतून बाहेर काढलेल्या खवले मांजराची पशुवैद्यकीय अधिकारी (कुडाळ) यांच्याकडून वैद्यकीय तपासणी करून त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात येणार असल्याचे वनविभागाने सांगितले.  

सदर मोहीम  मिलिंद शर्मा (उपवनसंरक्षक, सावंतवाडी),  सुनिल लाड (सहाय्यक वनसंरक्षक, सावंतवाडी) व चेतन पाटील (वनक्षेत्रपाल, कुडाळ) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.  

​या बचाव मोहिमेत  सूर्यकांत सावंत (वनपाल, नेरूर त. हवेली),  प्रसाद पाटील (वनरक्षक, ओरोस), अमित खरवत (वनरक्षक, नेरूर त. हवेली), यशवंत कदम (वनसेवक, नेरूर त. हवेली) आणि जलद कृती बचाव पथक कुडाळचे सदस्य सहभागी झाले होते. तसेच यावेळी स्थानिक ग्रामस्थ प्रविण रेडकर,  उदय मुंड्ये,  विनय मुंड्ये, सुरेश रेडकर,, महेश मुंड्ये, रमेश मयेकर, भिमराव मुंड्ये, धनेश पालकर, रमेश पालकर, संतोष शिंदे, महादेव बुटे आदी उपस्थित होते.