LIVE UPDATES

मनोज रावराणे ठरले देवदूत

१४ वर्षांच्या तन्मयला मिळाले नवे आयुष्य
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 16, 2026 12:13 PM
views 401  views

कणकवली : कणकवली तालुक्यातील नागवे गावातील १४ वर्षीय तन्मय गणेश खेडेकर याच्यासाठी जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे हे मदतीचा आधार ठरले आहेत. लहानपणापासूनच तन्मयला नाक आणि कानामध्ये असलेल्या गाठींमुळे श्वास घेण्यास तसेच ऐकण्यास त्रास होत होता.

तन्मयच्या या समस्येची माहिती मिळाल्यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते आणि जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे यांनी तातडीने दखल घेतली. शस्त्रक्रियेसाठी लागणारा खर्च उचलण्याचा निर्णय घेत त्यांनी तन्मयच्या उपचारासाठी पुढाकार घेतला. 

कणकवली येथील संजीवनी हॉस्पिटलमध्ये तन्मयवर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. या शस्त्रक्रियेसाठी सुमारे ३० हजार रुपयांचा खर्च आला असून, मनोज रावराणे यांच्या मदतीमुळे तन्मयला मोठा दिलासा मिळाला आहे.

या मदतीबद्दल तन्मयचे आई-वडील तसेच नागवे गावातील ग्रामस्थांनी पालकमंत्री नितेश राणे आणि जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे यांचे आभार मानले.

माणुसकीच्या या उपक्रमामुळे मनोज रावराणे यांनी लोकप्रतिनिधी म्हणून आपली सामाजिक बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.