
रत्नागिरी : सन २०१७-१८ पासून रत्नागिरी येथे कार्यरत असलेल्या कॅपसन इन्स्टिट्यूट, कोटा – रत्नागिरी शाखेने यावर्षीच्या MHT-CET (PCM/PCB) 2026 परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत आपल्या यशस्वी परंपरेला उजाळा दिला आहे.
यावर्षीच्या MHT-CET परीक्षेत संस्थेच्या ३३ विद्यार्थ्यांनी ९० पेक्षा अधिक पर्सेंटाइल मिळवून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. विद्यार्थ्यांची जिद्द, शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि पालकांनी संस्थेवर दाखविलेला विश्वास यामुळे हे यश संपादन करणे शक्य झाले आहे.
PCM गटामध्ये इंदुलकर प्रणव श्रीपत (99.00 %tile), गावडे देवदत्त धनंजय (98.88 %tile), भागवत पार्थ राजेश (98.76%tile), चुंडावत तेजस्विनीकुमारी भगवतसिंह (97.99 %tile), सोन्ने क्रिश महेंद्र (97.68 %tile), माळी अक्षय महादेव (97.54 %tile), डोळे सुमीत शाम (97.29 %tile), सावंत प्रथमेश मनोज (97.16 %tile), गोखले अश्विन श्रीकृष्ण (95.84 %tile), अमरे वेद (95.39 %tile), लोकरे अवंती (94.76 %tile), कोकरे सुजल रुपेश (93.83 %tile), चाळके निरज (93.66 %tile), सोलकर अब्रान (92.00 %tile) भाताडे देवेश दिलीप (90.06 %tile) सावंत श्रेया योगेश ( 89.36 % tile) खटकाळे स्वराली (89.36 % tile) विशेष यश संपादन केले.
तसेच PCB गटामध्ये गार्गी विकास पावसकर (99.99 %tile), अदिती उमेश नलावडे (99.35 %tile), सेजल राकेश तिवारी (99.04 %tile), अदिती कातळकर (98.88 %tile), पूर्वा सुर्वे (97.96 %tile), आदित्य कवडे (96.72 %tile), तन्वी चेतन सकपाळ (96.01 %tile), मेहेक अन्वर राजपूरकर (94.84 %tile), प्रणय बाळकृष्ण घाडी (94.62 %tile), आर्या राजेंद्र भस्मे (94.56 %tile), ताहिरा फातिमा वसीम बंदरकर (94.52 %tile), श्रावणी लिंगायत (94.41 %tile), अनुष्का विकास कुमरे (93.03 %tile), श्रेणी मांगले (92.07 %tile), आर्या राजेंद्र कदम (90.24 %tile) आणि वेदा कदम (90.24 %tile) यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संचालक संजय वसगडेकर, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. संस्थेच्या या यशामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाची आणखी एकदा प्रचिती आली आहे.













