LIVE UPDATES

संततधार पावसाचा तडाखा; आचिर्णेत घरावर आंब्याचे झाड कोसळले

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 17, 2026 20:02 PM
views 25  views

वैभववाडी : तालुक्यात गेल्या काही तासांपासून संततधार पाऊस सुरू असून, या पावसामुळे आचिर्णे घाणेगडवाडी येथे आप्पा धोंडू राणे यांच्या राहत्या घरावर आंब्याचे झाड कोसळून मोठे नुकसान झाले. ही घटना आज (१७) सायंकाळी साडेपाच वाजता घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

तालुक्यात आज दुपारनंतर पावसाची संततधार सुरू होती.याचा फटका घाणेगडवाडी येथील राणे कुटुंबीयांना बसला. त्यांच्या घरालगत असलेले आंब्याचे झाड अचानक उन्मळून घरावर कोसळले. झाडाचा मोठा भाग घराच्या छतावर पडल्याने घराचे नुकसान झाले. सुदैवाने राणे दांपत्य घरी नव्हते त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, झाड कोसळल्याने घराच्या छतासह इतर भागांचे नुकसान झाले असून, घरातील संसारोपयोगी साहित्याचेही नुकसान झाले आहे.घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घरावर कोसळलेले झाड हटविण्याचे काम सुरू केले.सायंकाळी उशिरा घरावरील झाड हटविण्यात आले.