
कुडाळ : भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून श्री विनायक सुझुकी, कुडाळ येथे १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. केवळ व्यवसाय किंवा उद्योग चालवणे हेच ध्येय न ठेवता, उराशी उज्वल देशप्रेम आणि राष्ट्रनिष्ठा बाळगणे तितकेच गरजेचे आहे, हा संदेश या कार्यक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाला.
कार्यक्रमाच्या प्रसंगी श्री विनायक सुझुकी शोरूमचे मॅनेजिंग डायरेक्टर (MD) श्री. राजेंद्र तेरसे यांच्या हस्ते भारतमातेला वंदन करून राष्ट्रध्वज सन्मानाने फडकवण्यात आला. राष्ट्रगीत आणि देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण शोरूम परिसर दुमदुमून गेला होता.
उद्योग क्षेत्रात श्री विनायक सुझुकी यांनी आपल्या उत्कृष्ट सेवेच्या जोरावर ग्राहकांचा मोठा विश्वास संपादन केला आहे. परंतु, केवळ व्यावसायिक नफ्याचा विचार न करता, प्रत्येक सण आणि राष्ट्रीय उत्सव तितक्याच तत्परतेने साजरे करण्याची परंपरा श्री. राजेंद्र तेरसे यांनी कायम जपली आहे. "उद्योग हा समाजाचा एक भाग आहे आणि देशाप्रती असलेले कर्तव्य हे प्रत्येक उद्योजकाचे पहिले ध्येय असायला हवे," हा विचार तेरसे यांनी आपल्या कृतीतून पुन्हा एकदा सिद्ध केला आहे.
या सोहळ्याला शोरूममधील सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कर्मचाऱ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना रुजवून त्यांना नेहमीच प्रोत्साहन देणाऱ्या श्री. राजेंद्र तेरसे यांच्या या उपक्रमाचे आणि राष्ट्रनिष्ठेचे कुडाळ शहरात व व्यावसायिक वर्तुळातून विशेष कौतुक केले जात आहे.











