
ओरोस : दरवर्षीप्रमाणे यंदाही ओरोस येथील वस्तीवर जाऊन तेथील बांधवांसोबत दिवाळीचा फराळ वाटप करत भाऊबीज साजरी करण्यात आली. भाजप जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया वालावलकर या गेल्या १५ वर्षांपासून हा सामाजिक उपक्रम अत्यंत आपुलकीने आणि सातत्याने राबवत आहेत.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून प्रेरित होऊन यावर्षीही हा भाऊबीज व दिवाळी फराळ उपक्रम उत्साहात पार पडला. वस्तीवरील बांधवांसोबत दिवाळीचा आनंद द्विगुणित करत त्यांना भाऊबीजेची भेट देण्यात आली.
या प्रसंगी भाजप जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया वालावलकर, पंचायत समिती सदस्य अमित भोगले, बूथ अध्यक्ष सिद्धेश बांबुळकर, 'न्यू लाईफ ग्रेस' संस्थेचे अध्यक्ष श्री. गोम्स, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संतोष वालावलकर, सर्व भाजप कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होता. स्थानिक ग्रामस्थांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत करत आभार व्यक्त केले.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








