LIVE UPDATES

Dodamarg News : केर गावात आरोग्य जागृतीची दिपावली

डीएसव्ही चॅरिटेबल ट्रस्टच्या मोफत आरोग्य तपासणीस ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 11, 2026 12:00 PM
views 34  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#

दोडामार्ग :  दिवाळीच्या आनंदात एकमेकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा सेवाभाव केर गावात दिसून आला. डीएसव्ही चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून मंगळवारी आदर्शगाव केर येथे मोफत सर्वसाधारण आरोग्य तपासणीचे  मोबाईल हेल्थ केअर व्हॅन च्या माध्यमातून आयोजित करण्यात आले. गावातील महिलांसह ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेत या सेवेचा लाभ घेतला.

 गावातच मोफत तपासणीची सुविधा उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. दैनंदिन धावपळीत स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी या आरोग्य सेवेने  ग्रामस्थांना संधी दिली. वेळेवर आरोग्य तपासणी करून घेण्याचे महत्त्वही या उपक्रमातून अधोरेखित झाले.

 ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवण्याची डीएसव्ही चॅरिटेबल ट्रस्टची बांधिलकी या उपक्रमातून दिसून आली. गावात ही सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामविकास अधिकारी यांनी ट्रस्टचे कार्यक्रम समन्वयक विकास कुलकर्णी यांचे आभार मानले.