LIVE UPDATES

माजगाव ग्रा. प. तर्फे पाणी अडवा, पाणी जिरवा वनराई बंधाऱ्यांचा शुभारंभ

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 09, 2026 19:53 PM
views 44  views

सावंतवाडी : माजगाव ग्रामपंचायतीच्यावतीने पाणी अडवा, पाणी जिरवा वनराई बंधाऱ्याचा शुभारंभ सरपंच रंजना कानसे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. वनराई बंधाऱ्यामुळे माजगावातील कासारवाडा, सोनबाहाह, खोतवडा, दळवीवाडा, म्हालटकरवाडा, नाईकवाडा, हरसावंतवाडा, मेटवाडा, भटवाडी, कुंभारवाडी, चिपटेवाडी आदी सर्व वाडीतील लोकांना याचा फायदा होणार आहे

यावेळी सरपंच रंजना कानसे यांनी पावसाचे वाहून जाणारे पाणी वाया न घालवता त्याची योग्य प्रकारे अडवून आणि जमिनीत जिरवणे या प्रकल्पाचा मुख्य उद्देश सांगितला तर माजगाव ग्रामपंचायत सदस्य संजय कानसे यांनी बंधाऱ्यामुळे पावसाचे पाणी विहीर, बोअरवेल, नाले भूजल शेतांमध्ये पाणीपातळी वाढविणे ,उन्हाळ्यात निर्माण होणारी पाण्याची तीव्र टंचाई दूर करणे ,पाण्याचा वेग रोखून जमिनीची धूप होण्यासाठी पासून संरक्षण करून मातीची गुणवत्ता टिकवणे असे विविध फायदे सांगितले.

यावेळी ग्रामपंचायत सरपंच रंजना कानसे, उपसरपंच रिचर्ड डिमेलो ,सदस्य अशोक धुरी, ज्ञानेश्वर सावंत, मधु कुंभार ,विशाखा जाधव ,माधवी भोगण,सायली सावंत, गीता कासार , श्याम कासार, ग्रामपंचायत कर्मचारी महेश सावंत, योगेश सावंत, विक्रम नाईक, संकेत घाडी, अक्षय जाधव, बचत गट प्रांजल शेटकर, प्रतिक्षा पवार, माया साळगावकर अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. तसेच पंचायत समिती सदस्य जितू गावकर यांचेही सहकार्य लाभले.