
देवगड : शेठ म. ग. हायस्कूल, देवगड येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर शाळासमिती अध्यक्ष व माजी मुख्याध्यापक चंद्रकांत शिंगाडे, मुख्याध्यापक प्रविण खडपकर, पर्यवेक्षिका निशा दहिबावकर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून करण्यात आले.
यावेळी नवागत विद्यार्थ्यांचे फुलांचा वर्षाव व गुलाब पुष्य देवून टाळ्याच्या गजरात स्वागत करण्यात आले. तसेच पालकांचे देखील गुलाब पुष्प देवून स्वागत करण्यात आले. यावेळी चंद्रकांत शिंगाडे यांनी विद्यार्थ्यांना सकारात्मक राहून कष्ट केल्यास आणि जिद्द ठेवल्यास हमखास यश मिळते असे मार्गदर्शन केले. प्रशालेचे मुख्याध्यापक प्रविण खडपकर यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
शाळेमध्ये राबवत असलेले उपक्रम आणि स्पर्धामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून विद्यार्थ्यांनी आपली कौशल्य विकसित करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार स्वरा कोयंडे यांनी मानले.











