
वेंगुर्ला : वेंगुर्ला पोलिस स्टेशनतर्फे सायबर व अंमली पदार्थ जनजागृती मोहिम हाती घेण्यात आली आहे. याचा सुरूवात मठ गावातून करण्यात आली. दरम्यान, १२ जून रोजी मठ ग्रामपंचायत येथे घेण्यात आलेल्या महिला मेळाव्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी सायबर गुन्हे करण्याच्या पद्धती व सायबर गुन्ह्रांबाबत जनजागृतीपर माहिती दिली.
यावेळी व्यासपिठावी वेंगुर्ला पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी, महिला पोलिस हेडकॉन्स्टेबल रंजिता चव्हाण, महिला पोलिस शिपाई कोंबे, पोखरे, पोलिस अंमलदार मनोज परूळेकर, सागर चौगुले, सरपंच रूपाली नाईक, महिला बचत गटाच्या अध्यक्षा वैभवी पोतदार, पोलिस पाटील अदिती परूळेकर, सतये पोलिस पाटील समिक्षा धुरी आदी उपस्थित होते. महिला पोलिस हेडकॉन्स्टेबल रंजिता चव्हाण यांनी महिलांच्या गुन्ह्यांबाबत जनजागृतीपर व्याख्यान देत व संवाद साधला. कार्यक्रमाचे आभार वैभवी पोतदार यांनी मानले.










