
कुडाळ : बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये आंतरराष्ट्रीय पुरुष दिनानिमित्त पुरुष कर्मचाऱ्यांचा सत्कार व अभिष्टचिंतन करण्यात आले. कौटुंबिक व सामाजिक जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतःकडे दुर्लक्ष करणाऱ्या पुरुषांच्या कार्याची दखल घेत महिला कर्मचाऱ्यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
संस्थेच्या सीईओ अमृता गाळवणकर, सल्लागार पल्लवी कामत, सायलीन वारंग, प्राचार्या चैताली बांदेकर, चित्रा कुंटे, प्राचार्या वैशाली ओटवणेकर, शांभवी मार्गी तसेच महिला प्राध्यापक व शिक्षिकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी मान्यवरांनी पुरुषांच्या जबाबदारीची जाणीव, सोशिकता आणि सामाजिक योगदानाचे कौतुक केले. या सत्काराबद्दल पुरुष कर्मचाऱ्यांनी आभार मानत स्त्री-पुरुष समतेतून सुजलाम-सुफलाम जग घडवण्याचा आशावाद व्यक्त केला.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








