
कणकवली : साकेडी-बोरीचीवाडी येथील बितोज म्हापसेकर (७२, साकेडी - बोरीचीवाडी) याच्या घरात कणकवली पोलिसांनी छापा टाकून गोवा बनावटीची दारू व गावठी दारू बनविण्याचे साहित्य जप्त केले. ही कारवाई शनिवारी दुपारी १.१० वा. सुमारास केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, साकेडी परिसरात एक व्यक्ती गोवा बनावटीची व गावठी दारू विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती कणकवली पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कणकवली पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने साकेडी-बोरीचीवाडी येथील बितोज म्हापसेकर याच्या घरावर छाप्पा टाकला. म्हापसेकर याच्या घराच्या मागील बाजूस गोवा बनावटीची दारू व गावठी दारू बनविण्यासाठी लागणारे साहित्य पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी गोवा बनावटीची दारू व गावठी दारू बनविण्याचे साहित्य पोलिसांनी जप्त केले. दारू व गावठी दारू वण्यासाठी लागणारे साहित्य असे मिळून २३ हजार ७५० रुपये किंमतीचे आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक वृषाली बर्गे, पोलीस हवालदार पांडुरंग पांढरे, श्री. ठोंबरे, फोंडघाटचे अमंलदार श्री. शिवगण, श्री. माने यांनी केली. याबाबत पोलीस कॉस्टेबल दिग्वीजय काशिद यांनी कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गोवा बनावटी व गावठी दारू बाळगल्याप्रकरणी बितोज म्हापसेकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.