
सावंतवाडी: मळगाव येथील श्रीकांत गायकवाड (वय ४१) या तरुणाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार आज दुपारच्या सुमारास उघडकीस आला. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याने यापूर्वी देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्याने आत्महत्या का केली ? याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.