
कणकवली : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे यांच्या वाढदिवसानिमित्त फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघात विविध सामाजिक व जनहिताचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. जिल्हा परिषद सदस्य मनोज रावरणे यांच्या पुढाकारातून फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य म्हणून मोफत २००० वह्यांचे वाटप करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या शिक्षणाला हातभार लागावा, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे मनोज राणे यांनी सांगितले.
तसेच पियाळी येथील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ यांच्या वतीने स्थानिक स्वयंभू मंदिरात पालकमंत्री नितेश राणे यांच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य व पुढील राजकीय वाटचालीसाठी दुग्धाभिषेक करण्यात येणार आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक उपक्रमांचे नागरिकांकडून स्वागत होत असून, मोठ्या संख्येने कार्यकर्ते व ग्रामस्थ यांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य मनोजरावराणे यांनी केले आहे
.










