LIVE UPDATES

job fair sindhudurg : वेंगुर्लेत २९ सप्टेंबरला रोजगार मेळाव्याचे आयोजन

‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ २०२६’ अंतर्गत आयोजन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 24, 2026 19:47 PM
views 29  views

सिंधुदुर्गनगरी : ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ २०२६ महाराष्ट्र’ या राज्यव्यापी उपक्रमांतर्गत कृषिभूषण आबासाहेब ऊर्फ रमाकांत मुकुंद कुबल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वेंगुर्ला यांच्या वतीने २९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्यामध्ये विविध क्षेत्रातील नामांकित कंपन्या सहभागी होणार असून, जिल्ह्यातील इच्छुक व पात्र उमेदवारांनी बायोडाटा तसेच शैक्षणिक अर्हतेची मूळ प्रमाणपत्रे घेऊन मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

देशातील युवकांना रोजगार, स्वयंरोजगार, कौशल्य विकास आणि उद्योग क्षेत्रातील अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ २०२६ महाराष्ट्र’ या राज्यव्यापी उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत राज्यभर एकाच दिवशी 8०० रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजित करण्यात आले आहेत. या मेळाव्यांचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.

उमेदवारांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घेऊन रोजगाराच्या उपलब्ध संधींचा फायदा घ्यावा, असे आवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वेंगुर्ला यांनी प्रसिध्दीपत्रकात केले आहे. अधिक माहितीसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वेंगुर्ला कॅम्पस तसेच महिला काथ्या कारखाना, नजीक वेंगुर्ला येथे संपर्क साधावा, असे प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.