LIVE UPDATES

कलबिंस्त येथील १५० हून अधिक विद्यार्थ्यांना जिजाऊ संस्थेतर्फे वह्यांचे वाटप

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 13, 2026 19:54 PM
views 44  views

सावंतवाडी : कोकणातील पाचही जिल्ह्यात जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या वतीने या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे हे सातत्याने गेली पंचवीस वर्ष आरोग्य, शिक्षण, रोजगार, प्रशिक्षण,महिला सबलीकरण अशा विविध क्षेत्रात कार्यरत असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक शाळांना व गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करत असतात.‌या उपक्रमाचा शुभारंभ सिंधुदुर्गात करण्यात आला आहे.

न्यू इंग्लिश स्कूल कलबिंस्तमध्ये दीडशेहून जास्त विद्यार्थ्यांना जिजाऊ परिवाराचे सदस्य व अटल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष  ॲड. नकुल पार्सेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत  मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी  ॲड.पार्सेकर यांनी निलेश सांबरे यांच्या सामाजिक कार्याची माहिती दिली.

यावेळी माजी सैनिक संघाचे अध्यक्ष व अटल प्रतिष्ठानचे विश्वस्त बाळकृष्ण लिंगवत यांनी ग्रामीण भागातील मुलांना अशा सामाजिक संस्थाकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल समाधान  व्यक्त केले. प्रशालेचे मुख्याध्यापक अभिजीत जाधव यांनी जिजाऊ संस्थेचे आभार मानले. कार्यक्रमाला धनराज सजगुरे, विनिता कविटकर, विलास चव्हाण, श्रध्दा पराडकर, रविकमल सावंत व इतर शिक्षक वर्ग आणि कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन किशोर वालावलकर यांनी केले.