LIVE UPDATES

सावंतवाडीत पंतप्रधानांचे फोटो रस्त्यावर टाकल्याचा प्रकार

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 14, 2026 21:01 PM
views 49  views

सावंतवाडी : सावंतवाडी पंचायत समिती कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या रस्त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे १० फोटो रस्त्यावर टाकल्याचे समोर आले आहे. हे फोटो कुणी टाकले ? कशासाठी टाकले ? याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती मिळाली नाही. 

एकीकडे देशभक्तीचे वातावरण असताना शासकीय स्तरावर विविध उपक्रम राबवले जात असताना दुसरीकडे महापुरुषांचा आणि देशाच्या पंतप्रधानांचा रस्त्यावर फोटो टाकून अनादर झाल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. हे कृत्य नेमके कोणी केले? कोणत्या हेतूने केले? याबाबत प्रश्न उपस्थित होत असून पोलिसांनी या प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.