LIVE UPDATES

करूळ बौद्धवाडीत नवीन वीज वितरण डीपीचे उद्घाटन

पालकमंत्री नितेश राणेंच्या माध्यमातून डीपी मंजूर; ग्रामपंचायतीच्या पाठपुराव्याला यश
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 22, 2026 19:00 PM
views 31  views

वैभववाडी : करूळ बौद्धवाडी येथे जीर्ण झालेल्या जुन्या वीज वितरण डीपीऐवजी नव्याने उभारण्यात आलेल्या डीपीचे (रोहित्र) उद्घाटन जिल्हा बँकेचे माजी संचालक दिगंबर पाटील आणि पंचायत समितीच्या उपसभापती साची कोलते यांच्या हस्ते करण्यात आले.

या उद्घाटनप्रसंगी सरपंच नरेंद्र कोलते, माजी सरपंच हिंदुराव पाटील, रवींद्र पवार, प्रकाश सावंत, महेश कदम, सचिन कोलते, रोहिणी लाड, शरद सावंत, राजेंद्र गुरव, सिद्धेश कोलते, सुधीर पवार, विजय पवार, दिलीप पवार तसेच वीज वितरण कंपनीचे अधिकारी तळेकर, वायरमन गायकवाड, पाटणकर, अवि गुरव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

करूळ बौद्धवाडी येथील जुनी डीपी जीर्ण आणि धोकादायक अवस्थेत झाली होती. त्यामुळे या ठिकाणी नवीन डीपी बसविण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत होती. ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत ग्रामपंचायत करूळने नवीन डीपी मंजूर होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला.

ग्रामपंचायतीच्या या पाठपुराव्याला यश आले असून, पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून नवीन डीपी मंजूर करण्यात आली. पालकमंत्री राणे यांनी वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्यानंतर संबंधित यंत्रणेकडून नवीन डीपी बसविण्याचे काम पूर्ण करण्यात आले.या नवीन डीपीमुळे बौद्धवाडीसह परिसरातील वीजपुरवठा अधिक सुरक्षित आणि सुरळीत होण्यास मदत होणार आहे. जुन्या जीर्ण डीपीमुळे निर्माण झालेला धोका दूर झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.