LIVE UPDATES

नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले विठ्ठल सेवेत दंग

सावंतवाडी विठ्ठल मंदिरात वीणा सप्ताहाचे आयोजन
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 23, 2026 12:55 PM
views 23  views

सावंतवाडी : येथील प्रतिपंढरपूर श्री विठ्ठल मंदिरात दरवर्षीप्रमाणे हरिनाम वीणा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. आज या सप्ताहाची सांगता होणार असून नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी उपस्थित राहत विठ्ठल सेवेत सहभागी झाल्या. या सप्ताहाच्या निमित्ताने दररोज वारकरी भजन, कीर्तन, सांगीतिक कार्यक्रम होत असून भक्तीमय वातावरण निर्माण झाल आहे‌.

सप्ताहात निमित्ताने विविध धार्मिक, आध्यात्मिक कार्यक्रम इथे होत आहेत. आज सप्ताहाची सांगता होणार असून याप्रसंगी नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी उपस्थित राहत विठ्ठल सेवेत सहभाग घेतला. यावेळी सभापती आनंद नेवगी, प्रतिक बांदेकर, दिपाली भालेकर, नगरसेविका निलम नाईक, सुकन्या टोपले, सुनिता पेडणेकर आदींसह विठ्ठल भक्त उपस्थित होते. २५ जुलै रोजी आषाढी महाएकादशी निमित्त पहाटे श्रींची काकड आरती, महापूजा तसेच विविध मान्यवर कीर्तनकारांची कीर्तने आदी विविध कार्यक्रम होणार आहेत.