LIVE UPDATES

फ्लायओव्हर ब्रिजवरील भगदाडं लपवण्यासाठी घाईघाईने प्लास्टरिंग

डॉ. जयेंद्र परुळेकर यांचा आरोप
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 23, 2026 14:04 PM
views 26  views

सावंतवाडी : मुंबई-गोवा महामार्गावर झाराप आणि इन्सुली खामदेव नाका येथील फ्लायओव्हर ब्रिज अजून सुरूही झालेले नाहीत. मात्र, त्यांना भगदाडं पडू लागलीत. ती भगदाडं दिसू नयेत म्हणून लपवली जात आहेत आणि घाईघाईने त्यावर प्लास्टरिंग केलं जात आहे असा आरोप डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केला आहे.ते म्हणाले,  मुळात या महामार्गावर अजूनही वाहतूक तुरळक आहे.‌ ट्रॅफिक अजिबात नाही आणि ट्रॅफिक जामचा तर प्रश्नच नाही. 

असे असताना हे फ्लायओव्हर ब्रिज बांधण्यात आले ते कोणाचे हात ओले करण्यासाठी ? ते अनाकलनीय आहे.  निकृष्ट दर्जाचे बांधकाम करून बांधण्यात आलेले हे ब्रिज नजिकच्या भविष्यकाळात जर पडले आणि वरून जाणाऱ्या वाहनांचा भीषण अपघात झाला तर कोण जबाबदार असणार आहे ? ब्रिजेसच्या बांधकामाचे ऑडिट होणं गरजेचं आहे. जनतेचे जीव घेणारे हे धोकादायक ब्रिज वाहतूकीसाठी सुरक्षित आहेत याची हमी सामान्य जनतेला मिळाली पाहिजे अशी मागणी डॉ जयेंद्र परुळेकर यांनी केलीय.