LIVE UPDATES

मालवण शहरातील वीज तसेच स्ट्रीट लाईटच्या समस्या तातडीने दूर करा

सहदेव बापर्डेकर व अश्विनी कांदळकर यांची मागणी : तातडीने कार्यवाही करण्याचे अधिकाऱ्यांचे आश्वासन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 09, 2026 18:21 PM
views 28  views

मालवण : शहरातील वीज तसेच स्ट्रीट लाईटच्या ज्या समस्या आहेत त्या तातडीने दूर करा अशी मागणी करीत मालवण नगरपरिषद बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर व महिला बालकल्याण उपसभापती अश्विनी कांदळकर यांनी मालवण वीज वितरण कार्यालयात वीज अधिकाऱ्यांची भेट घेऊन अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. यावेळी अनिल कांदळकर हेही उपस्थित होते.

नागरिकांना तत्पर सेवा मिळाली पाहिजे या दृष्टीने त्वरित कार्यवाही झाली पाहिजे. आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत असेही सहदेव बापर्डेकर यांनी सांगितले.

मेढा कुंभार गल्ली कोतेवाडा परिसरातील स्ट्रीट लाईटची समस्या दूर करण्यासाठी फेज टाकून देण्याची ही मागणी नगरपरिषद स्तरावरून करण्यात आली आहे. या कामाबाबतची पुढील कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांची गैरसोय दूर करावी. यांसह परिसरातील अन्य वीज समस्या प्राध्यानाने सोडवव्यात. वीज खांब तसेच वीज वाहिनी यावर मोठया प्रमाणात झाडी वेली वाढल्या आहेत. त्यामुळे विज समस्या निर्माण होत आहेत. त्याबाबतही तातडीने कार्यवाही व्हावी असेही यावेळी सांगण्यात आले.

वीजपुरवठ्याशी संबंधित अडचणी, स्ट्रीट लाईटच्या समस्या आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या अन्य वीजविषयक प्रश्नांबाबतही यावेळी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले. शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेषतः रात्रीच्या वेळी स्ट्रीट लाईट सुरळीत असणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. वीज वितरण विभागाकडून आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्यात येईल, असे वीज अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.